मुंबई : सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्या लोकसभेत बोलत होत्या.
माझे सहकारी महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचं काम सुरु आहे सांगत आहेत. त्यावरुन मी सांगू इच्छिते की, जो व्यक्ती 16 वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं. जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितलं होतं. फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आलं तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतलं. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली, असं नवनीत राणा म्हणाल्या.
दरम्यान, जर अशा पद्धतीनं खंडणी वसुल करण्याचं काम सुरु झालं तर संपूर्ण देशात असं होऊ शकतं. माझी विनंती आहे की, ज्याप्रकारे इतर आरोपांवर लागले आहेत, मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला 100 कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल? असा प्रश्नही नवनीत राणांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल
देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर…; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल