Home नाशिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन झालं. यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मास्क शिवाय सहभागी झाले. तसेच यावेळी त्यांनी मास्क न घालताच भाषणही केलं.

महाराष्ट्र पोलिसांनी बंधुत्वाची भावना जोपासली आहे आणि देशात त्याचे गौरवाचे स्थान सुनिश्चित केले आहे. बदलत्या काळानुसार त्यांच्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सांगितलं.

दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलत आहे. मोकळ्या वातावरणात मास्क शिवाय बोलण्याचा माझा हा पहिलाच कार्यक्रम असेल. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा नाशिकला आलो होतो. त्यावेळी मी भारावून गेलो होतो. आजही भारावून गेलो आहे. पोलिसांचं संचलन बघूनही भारावलो आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“धक्कादायक! भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार”

दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे कडाडले

तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचि

“देशाला 2014 पासून ग्रहण लागलंय, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक आज सत्तेत आहेत”