मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार; आमदार रवी राणांचा आरोप

0
366

मुंबई : आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा असल्याचे माझ्याकडील पुरावे मी इडीला देणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची कुठे कुठे किती प्रॉपर्टी आहे, त्याची यादी माझ्य़ाकडे आहे. ती यादी मी येणाऱ्या काळात ईडीला देणार आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं.

दरम्यान, नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला आहे. मात्र असं असलं तरी, आपल्याविरोधात राजकीय खिचडी शिजत आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्यामुळेच आपला आवाज दाबण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप राणा यांनी शिवसेनेवर केला.

महत्वाच्या घडामोडी –

मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे….; रामदास आठवलेंचा त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोला

सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरतंय- चंद्रकांत पाटील

सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे- देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here