Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्याचीच बाजू घेतील, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास- क्रांती रेडकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्याचीच बाजू घेतील, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास- क्रांती रेडकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांवर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : वराड बुद्रुक येथे भाजपाला खिंडार; ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा

माझा महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, एक माणूस सरकारला इन्फ्लुन्स नाही करू शकत. कारण, काहीही झालं तरी सत्य वर येणार. त्यावेळी, आपले मुख्यमंत्री सत्याचीच बाजू घेणार, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर बोलत होत्या.

दरम्यान, नवाब मलिक असं का वागताहेत ते मला कळत नाही, आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा आहेत. मीडिया ट्रायल करून आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ते ट्विटरवर का पोस्ट करतात? त्यांनी न्यायालयात जावे, असंही क्रांती रेडकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”