Home पुणे दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री...

दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केलं.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा आहे. शिवरायांची कीर्ती आणि तेज जगभरात पोहोचवण्याचं काम सरकार करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या. त्यातली एक भाषा मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितली. अजितदादांना ती भाषा येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.

महत्वाच्या घडामोडी –

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा, जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”

छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”

“शशिकांत शिंदे आणि मी एकच; शिवेंद्रराजेंची होणार राष्ट्रवादीत घरवापसी?”