Home नाशिक “येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल”

“येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल”

नाशिक : भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावरून आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधू हत्या पाप फेडावे लागेल. येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते

अनिल देशमुख यांना पालघर येथील साधु हत्येचा तळतळाट लागला असून त्यामुळेच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनाही हे पाप फेडावे लागणार आहे. आणि येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”

“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा