मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर

0
151

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी सरकारवर आरोप केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं राणेंना खुलं आव्हान

ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here