आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशात वाढणाऱ्या नक्षलवादी कारवायांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. ही बैठक येत्या रविवारी आयोजित केली आहे.
महाराष्ट्रातील होणाऱ्या नक्षली कारवायांबाबत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली होती. ज्या भागात नक्षलवादी कारवाया होत आहेत तिथे विकासकामे देखील थांबली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत नक्षलवादी भागात विकासकामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
दरम्यान, ही बैठक झाल्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही राजकीय चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा करणार, कारण…; संजय राऊतांचा चिमटा
शरद पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले
नाशिक महापालिकेसाठी मनसेची जय्य्त तयारी; महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरेंचा ‘हा’ प्लान
भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा