मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. हे लॉकडाऊ शिथील करण्याबाबत अनेक मतं-मतांतर आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला लॉकडाऊन शिथील करण्याची वेळ आली आहे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ‘सकाळ’ या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
लॉकडाऊन जर असाच सुरू ठेवला तर दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची हालत बिकट होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. कोरोनाच्या भीतीने बचावात्मक पवित्रा घेतला तर राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन शिथील करावा, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सवाल
आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात
…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे
लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे