मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याच्या निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. यानंतर जितेंद्र आव्हाड नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी यावर तोडगा काढत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर केल्याचं कळत आहे.
मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला आणि बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी यावेळी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता. काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, याचा मला खूप आनंद झाला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवशाही सरकार नसून, बेबंदशाही सरकार आहे”
ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील असं शरद पवार म्हणालेत”
26 जूनच्या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार जळून जाईल- सुधीर मुनगंटीवार