मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे, असं म्हणत प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लक्षवेधी कामगिरी करू शकलो, असं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे. ते लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी रोज 2 लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर 38 टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झालं, असं तात्याराव लहाने म्हणाले.
यावेळी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. हा आजार आणखी वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून मास्क लावावा लागणार आहे, असंही लहानेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘भिडे मास्तर’ ला कोरोनाची लागण
“पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”
“पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार”
“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”