Home महत्वाच्या बातम्या “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाउन केले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे यासाठी होतो आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल आहेत असंच चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे.

लॉकडाउन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सूचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारने प्रयोगशाळा 130 पर्यंत वाढवल्या आहेत, एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अखेर ठरलं! पंकजा मुंडेंची दिल्ली वारी पक्की; सोबतच ‘या’ नेत्यांनाही दिल्लीत संधी

“हे सरकार पडणार नाही; मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत”

अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक

‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल