Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, जिरायत आणि बागायतसाठी हेक्टरी 10 रुपये राज्य सरकारने जाहीर केलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे., असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत., असंही फडणवीस म्हणाले.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली., असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नाथाभाऊ काय चीज आहे हे तुम्हाला दाखवून देऊ- शरद पवार

पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत, म्हणजे राजकारणात मजा येईल- गुलाबराव पाटील

“एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश”

कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है- जयंत पाटील