सांगली : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. या महापुजेसाठी उद्धव ठाकरे यांनी कार स्वत: आठ तास ड्राईव्हिंग करत पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“बाॅलिवूडमध्ये कुठल्याही लफडेबाज माणसाचा विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच”
पेगॅससचे खरे बाप देशातच, आधी त्यांना शोधा; सामनातून हल्लाबोल
आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल
“मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत चक्क मास्क लावला”