आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापूरला जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावरून आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली.
सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहित आहे की नाही हे माहित नाही. परंतु कालच्या घटनेचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोला
शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार
“परभणीत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”