आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शिंदे हे सकाळी मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान ते सायंकाळी शरद पवारांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेले. यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधत भेटीविषयी माहिती दिली.
हे ही वाचा : मला कोणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, शिवसैनिक आमच्या पाठीशी; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला
पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील ज्येष्ठ नेते आहेत. सत्तासंघर्षामध्ये जरी ते विरोधी बाकावर असले तरी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने आपण ही भेट घेतली असल्याचं शिंदेंनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे म्हणाले, रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली, आता एकनाथ शिंदे म्हणतात…
वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…
…या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं- गुलाबराव पाटील