मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रविवारी ज्याप्रमाणे सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच अभिनंदन केलं.
महत्वाच्या घडामोडी-
…तर राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल- अजित पवार
राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा; रक्तदान करा आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक
भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे