मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा रणाैतच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
गेले काही दिवस कंगणा आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढला आहे. खरंतर या वादाला इतकं महत्व देण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर जनतेने दुर्लक्ष करावं यासाठी शिवसेनेनं ही गोष्ट लावून धरली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलांचं संरक्षण करायला शिकवलं. मात्र हे सरकार कंगणाच्या मागे लांडग्यासारखं लागले, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, हे स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतात, परंतु महाराजांनी कल्याणची सुभेदाराची सून मानाने साडीचोळी देऊन घरी पाठवली होती. परस्त्रीविषयी असलेला आदरयुक्त धोरणाचा महाराजांनी नेहमीच अवलंब केला आणि हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन
संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या; नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल; कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
…तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा