आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार!, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : समृद्ध जीवन मल्टिस्टेटमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत घेण्यासाठी जनसंघर्ष समितीचा ३० रोजी आंदोलनाचा इशारा
आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे फक्त आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
कोल्हापुरात भाजपला मोठं खिंडार; हा मोठा नेता करणार पक्षाला रामराम?
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना
उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलत-बोलत…; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट