Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना…; चंद्रकांत पाटलांचा...

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना…; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात महिला आत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उरण, खारघर आणि पनवेलमध्ये शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्रजी तुम्ही जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा; अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

फक्त 5 वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोप सारखे होतील- नितीन गडकरी

“सत्ता गेल्यानं भाजप विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत”