मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने हा मोठा निर्णय दिला. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले आहे. पण त्यांना झालेला हा त्रास कधीही भरुन निघणार नाही. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. भुजबळ यांनी जे काम केले होते, ते योग्य पद्धतीने होते, यावर आज या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी छगन भुजबळांचं तोंडभरून काैतुक केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
केंद्र सरकारच्या पत्रानंतरच राणे कुटूंबियावर कारवाई- दिलीप वळसे पाटील
“कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”
“मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत, त्यामुळे 2024 ला काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार”
“गुलाबराव पाटील यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट, चर्चांना उधाण”