Home क्रीडा चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक

मुंबई : आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर  163 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या लक्ष्याचा चेन्नई सुपर किंग्ज यशस्वीपणे सामना करत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. मुंबईकडून सौरभ तिवारीने 31 चेंडूत सर्वाधिक 42 धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने 10 चेंडूत 12 क्विंटन डी कॉक 33, हार्दिक पांड्या 14, किरॉन पोलार्डने 14 धावा केल्या. तर चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3, रविंद्र जडेजाने 2, दिपक चहरने 2, तसेच सॅम करन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला.

फाफ  प्लेसिस आणि रायुडूने चेन्नईचा डाव सावरला असून तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकीय भागीदारी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली आहे.

दरम्यान, तसेच अंबाती रायडूने आपले अर्धशतकही पूर्ण केलं आहे. रायडूने 41 चेंडूत 64 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 6 चाैकार व 3 षटकार मारले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण”

“राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण “

“मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली “

मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे- चंद्रकांत पाटील