मुंबई : आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली नाही झाली. त्यांच्या पहिल्या 2 विकेट्स केवळ 6 धावात गेल्या. नंतर मात्र फाफ ड्यू प्लेसिस आणि रायुडूने चेन्नईचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनी अर्धशतकीय भागीदारी केली. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसिस आणि रायुडूने अर्धशतक केले आणि त्यामुळे चेन्नईला विजय मिळवता आला. रायडूने 48 चेंडूत 71 धावा केल्या. तर फाफ ड्यू प्लेसिसने 43 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या.
मुंबईकडून सौरभ तिवारीने 31 चेंडूत सर्वाधिक 42 धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने 10 चेंडूत 12 क्विंटन डी कॉक 33, हार्दिक पांड्या 14, किरॉन पोलार्डने 14 धावा केल्या. तर चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3, रविंद्र जडेजाने 2, दिपक चहरने 2, तसेच सॅम करन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला.
महत्वाच्या घडामोडी-
चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक
“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण”
“राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण “
“मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली “