आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेेन्नईने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत केवळ 157 धावा केल्या. मुंबईकडून टीम डेव्हिड व इशान किशानने प्रत्येकी 31 धावा केल्या, तर तिलक वर्माने 22, तर कर्णधार रोहित शर्माने 21 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाजांनी निराशा केल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता नाही आली. तर चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 3, तुषार देशपांडे व मिचेल सँटेनरने प्रत्येकी 2, तर आयपीएलचा पहिलाच सामना खेळणाऱ्या सिसांडा मगालाने 1 विकेट घेतली.
ही बातमी वाचा : “काँग्रेसला धक्यावर धक्के, आता ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने हे लक्ष्य 19 व्या षटकातच 3 विकेट गमावत पूर्ण केलं. चेन्नईकडून या मोसमातील पहिलाचा सामना खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने धुवांधार फलंदाजी करताना 27 चेंडूत 61 धावांची विस्फोटक खेळी केली. रहाणेच्या या खेळीत 7 चाैकार, 3 षटकारांचा समावेश होता. तर रुतुराज गायकवाड 36 चेंडूत नाबाद 40, शिवम दुबे 26 चेंडूत 28 धावा, तर अंबाती रायडूने 16 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या.
महत्त्वाच्या घडामोडी
आधी शरीरसंबंध ठेवले आणि मग…; नवी मुंबईत रिक्षा चालकाचं संतापजनक कृत्य
17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…
लखनाैची विजयी घाैडदाैड कायम, कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीनं लखनाैची हैदराबादवर 5 विकेट्सने मात