दुबई : इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 27 धावांनी विजय मिळवत चौथ्यांचा आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने 20 षटकांत 3 बाद 192 धावा करत कोलकाता नाईट रायडर्सला 193 धावांचं आव्हान दीलं . या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाला 20 षटकांत 9 बाद 165 धावाच करता आल्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिलने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही कोलकाताला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र षटकात शार्दुल ठाकूरने व्यंकटेश 50 धावांवर माघारी धाडत कोलकाताला पहिला धक्का, तर नितीश राणा शुन्यावर बाद करत दुसरा धक्का दिला. यानतंर हेजलवूडने 12 व्या षटकात सुनील नारायणचा अडथळा दूर केला. तर दिपक चाहरने 14 व्या षटकात शुभमन गिलला पायचीत करत माघारी धाडले.
हे ही वाचा : “ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत अजून जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं त्याला ठेचू”
त्यामुळे, दिनेश कार्तिक आणि ओएन मॉर्गन ही नवी जोडी मैदानात उतरली. पण रविंद्र जडेजाने कोलकाताला 15 व्या षटकात दुहेरी धक्का देत कार्तिक आणि शाकिब अल हसन यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.
त्यानंतर शार्दुलने राहुल त्रिपाठीला 2 धावांवर 16 व्या षटकात, तर 17 व्या षटकात ओएन मॉर्गनला 4 धावांवर जोश हेजलवूडने बाद केले. अखेर लॉकी फर्ग्यूसन आणि शिवम मावीने काही आक्रमक फटके खेळले. पण, ते कोलकाताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. मावीला ड्वेन ब्रावोने अखेरच्या षटकात बाद केले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकात 165 धावाच करता आल्या.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दीपक चाहर आणि ड्वेन ब्रावोने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“कोणी कितीही दावा करा, मात्र पुणे-पिंपरीत महापाैर राष्ट्रवादीचाच होणार”
“प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरेंना बोलवा, महाराष्ट्राला चांगला संदेश जाईल”
भाजपने आमचा विश्वासघात केला या मतावर मी आजही ठाम- महादेव जानकर