नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा; गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

0
230

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनवला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट त्याने 27 भाषांमध्येही तयार केला आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदींवर 27 भाषांमध्ये बायोपिक करणाऱ्या संदीप सिंहचे भाजपशी काय संबंध आहेत? बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांशी काय संबंध आहेत? याचा तपास करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने माझ्याकडे आली होती. ती निवेदने मी सीबीआयला दिली आहेत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे, याची आपल्याला कल्पना आहे. त्यांचे 5 वर्ष सरकार होते. त्यावेळी त्यांनी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे, असा टोला अनिल देशमुख यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

माझा अभ्यास तुमच्या इतका नाही, तरीही…; रोहित पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; अतिदक्षता विभागात उपचार

बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर…; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here