मुंबई : मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोर इथं समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिले आहेत, यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
तुम्हीपण प्रकल्पाचा प्रहार थांबवा!! एकिकडे पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची आणि दुसरीकडे दानव बनून त्याच मुंबईच्या समुद्राचे पाणी “गोडे” करुन पर्यावरणावर प्रहार करायचा.. हा बालहट्ट म्हणजे आपणच पायावर मारलेली कुऱ्हाड आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
केवळ आमची बोलून मुंबई आपली होत नाही..त्यासाठी स्वार्थापोटी,मुंबईला न परवडणाऱ्या, खर्चीक, मच्छीमारांना उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाचा प्रहार थांबवावा लागेल. अन्यथा दरवर्षी समुद्र आणि पावसाचे रौद्ररूप पाहतोच… भविष्यात मोठे हाहाकार मुंबईला बघावे लागतील, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
तुम्हीपण प्रकल्पाचा प्रहार थांबवा!!
एकिकडे पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची.. दुसरीकडे दानव बनून त्याच मुंबईच्या समुद्राचे पाणी “गोडे” करुन पर्यावरणावर प्रहार करायचा.. हा बालहट्ट म्हणजे आपणच पायावर मारलेली कुऱ्हाड आहे…
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 10, 2021
महत्वाच्या घडामोडी
अमित भाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल- चंद्रकांत पाटील
“मुंबईत भाजपला मोठा धक्का! राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश”
“सलग 3 दिवस बॅंका राहणार बंद; पहा कधी ते”
मी या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री- कंगणा रणाैत