पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही; सतेज पाटलांचं धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर

0
143

कोल्हापूर : जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा निष्क्रिय पालकमंत्र्याना बदलून धडाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावं, अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पालकमंत्री बदलणं म्हणजे पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही, असं म्हणत सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत.

माझ्यावर निष्क्रियतेचा टीका करताना धनंजय महाडिक यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पावणे तीन लाख मतांनी पराभव झाला होता हे पाहावे. यावरुन ते किती सक्रिय होते हे स्पष्ट होते.त्यामुळेच नागरिकांना त्यांना निष्क्रिय ठरवलं, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विश्व क्रिकेटला तुझ्या हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल माही; धोनीच्या निवृत्तीवर अमित शहांचं ट्विट

धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना

या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे; भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

जगाने तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला; धोनीच्या निवृत्तीवर कोहलीचं भावूक ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here