मुंबई : केंद्रीय टीमने नुकताच सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्रीय टीमने राज्य सरकारला दिला आहे. यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता कोरोना आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्याने काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे… पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.
दरम्यान, केंद्रीय टीमने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहून चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग आणि त्याचबरोबर कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वाढवण्याचा सल्लाही केंद्रीय टीमने राज्य सरकारला दिला आहे.
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता कोरोना आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्याने काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे… पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस
“शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”
“अश्लिल चित्रपटाच्या चित्रीकरणावरून शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांना अटक”
आम्हाला पुन्हा आषाढी वारीत तुडूंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे