सांगली- भाजप हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मात्र काही जणांना मला पुन्हा पक्षात संधी मिळते का. मला जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळते का, याची चिंता लागली आहे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता लगावला.
तासगाव शहर आणि ग्रामीण अशा दोन भाजप कार्यालयांचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, वैभव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पण या उद्घाटन सोहळ्यात भाजपा मधेच गटबाजी पाहायला मिळाली.

