Home महाराष्ट्र “चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”

“चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा; अजित पवार म्हणतात…”

मुंबई : अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं, असा सल्ला दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी उत्तर दिलं आहे.

“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

“विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश”

भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

विराटसेनेचा विजयी चौकार; बेंगलोरचा 10 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…- अमृता फडणवीस