Home महाराष्ट्र “चंद्रकांतदादा निष्पाप, निर्मळ मनाचे, सरकार पडत नसल्यानं नैराश्यात, पण प्रयत्न सूरू ठेवा”

“चंद्रकांतदादा निष्पाप, निर्मळ मनाचे, सरकार पडत नसल्यानं नैराश्यात, पण प्रयत्न सूरू ठेवा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या 10 मार्च नंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर ठाकरे सरकारही जाईल, असंही पाटील म्हणाले. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांतदादा निष्पाप आहेत. स्वच्छ हृदयाचे आहेत. निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. राज्यातील आघाडी सरकार पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा उपरोधक टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा : “मनसेत इनकमिंग सूरुच, कट्टर मनसे समर्थकानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

दरम्यान, चंद्रकांत दादांविषयी मला पूर्ण सहानभूती आहे. दादा किंवा त्यांचा पक्ष असेल. ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे आहेत. त्यांचा प्रयत्न असतो सरकार पाडण्याचा पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात. 10 मार्च नंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येतील. त्यानंतर सरकार पडेल, असं आता ते म्हणाले. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. त्यानंतर सरकार पडणार असं म्हणाले होते. सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांची हत्यारे वापरावीत, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“लाॅर्ड ठाकूरवर पैशांचा पाऊस; तब्बल 10 कोटीला ‘या’ संघानं घेतलं आपल्या संघात”

आता मी हेमा मालिनीचा हात सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला; गुलाबराव पाटलांचं आणखी एक नवं विधान

नारायण राणेंचा झाला लोकसभेत घोटाळा; नारायण राणेंनी केली ‘ही’ चुक, सभापतींनी कसं निस्तारलं?