चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

0
389

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला. यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही. चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं- चंद्रशेखर बावनकुळे

औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात- अमोल मिटकरी

देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले

खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here