“महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन ढासळलंय”

0
308

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणला आहे.

अमित शहा हे चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे मला माहित नाही. महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. त्यांचं पत्र किती गांभीर्याने घ्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा- चंद्रकांत पाटील

“त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

“पडळकर ही एक प्रवृत्ती आहे, आणि अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत”

अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चाैकशी करा; भाजपचं अमित शहांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here