माझं उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा खोचक टोला

0
354

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.

संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावरून आता संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

माझं उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, चंद्रकांत पाटलांची प्रकृती नीट रहावी म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

चंद्रकांत पाटलांना तुम्ही इतके गांभीर्याने का घेता? त्यांची वक्तव्य नैराश्यातून, वैफल्यग्रस्तातून येत असतात. तुम्ही देखील त्यांना गांभीर्याने घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल, असा पलटवार संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

“शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा”

“बिघाडी सरकारला सत्ता हवी, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची हिंमत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here