आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची मोजणी झाली असून यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. सध्याच्या या निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली, आम्हाला राज्यात काम करण्यासाठी फक्त पाच वर्षे मिळाली. पण यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या विकासासाठी गोष्टी मांडल्या. अखेर कोणाला कौल द्यायचा हे मतदारांनी ठरवायचं असतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय
तीन पक्षांनी प्रतिष्ठेने काम केलं असून आम्ही एकट्यांनी 77426 मतं मिळवली, महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस अणला, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, काँग्रेसच्या जयश्री जाधव या 96226 इतकी मत मिळाली आहेत, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 77426 इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे
महत्वाच्या घडामोडी –
“कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”
“कायम राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारा मी माणूस, पण पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो”
…तर कारवाई केली जाईल; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून रूपाली पाटलांचा इशारा