चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा करणार, कारण…; संजय राऊतांचा चिमटा

0
292

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत चंद्रकात पाटलांवर दावा करणार असल्याचं म्हटलंय.

चंद्रकांतदादांनी पाठवलेल्या पत्रात काही दळभद्री आरोप केले आहेत आमच्यासंदर्भात. पीएमसी बँक आणि अमूक बँक. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर दावा करणार आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, इतर लोकं लावतात 100 कोटी, 50 कोटी असा दावा करणार नाही. सव्वा रुपयांचा दावा लावू. त्यांची तेवढीच ताकद आहे. सव्वा रुपयेच फक्त. त्यांच्याकडे तेवढेच आहेत. सव्वा रुपयावाले आहेत. 100 कोटींचा दावा कशाला? मला नको शंभर कोटी. ज्यांना हवा ते दावा लावतात. सव्वा रुपया ठिक आहे. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा असतो, असा चिमटाही संजय राऊतांनी यावेळी काढला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

नाशिक महापालिकेसाठी मनसेची जय्य्त तयारी; महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरेंचा ‘हा’ प्लान

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here