आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. या निकालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर या विजयाने शिक्कामोर्तब केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आधी कोल्हापूरातून पलायन केले होते. कोल्हापुरात पराभव झाला तर हिमालयात जाऊ असे ते म्हणाले होते आता त्यांनी पुण्यातून हिमालयात पलायन करावे, असा टोला नाना पटोलेंनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावला.
हे ही वाचा : मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यात हनुमान चालिसेचं पठण
कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत धार्मिक रंग देणाऱ्या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मिळाली अवघी ‘इतकी’ मतं
मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…