चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी; अन्यथा…; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

0
169

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सर्व आरोप खोडून काढत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते कोल्हापूर मध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटील त्यांच्या अज्ञातावर बोलतात आणि स्वतःचं हसू करुन घेतात, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी ग्रामविकास विभागावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास विभागावर काही आरोप केले. त्यांनी माहितीच्या आधारे आपले वक्तव्य केलं असतं तर मी समजू शकलो असतो. पण त्यांनी अज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य केलं. त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी माझी मागणी आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर मी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही; फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

मोदी तुम्हाला गुरु मानतात; यावर शरद पवार म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here