Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण

चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण

मुंबई : राज्यात सध्या 102 व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा जास्तच चर्चेत आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवरून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी भाजवर निशाणा साधलाय.

मल्लिकार्जुन खरगे, बाळू धानोरकर, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे, अधिर रंजन चौधरी, डॉ. अभिषेक मनू सिंघवी, विनायक राऊत, प्रतापराव जाधव हे संसदेतील आरक्षणाच्या लढाईतील योद्धे आहेत. खासदार संभाजीराजे यांचा अपवाद वगळता भाजपाचे अन्य खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून होते. आता भाजपाने समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये; कारण यातून काहीही फायदा होणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आता आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी –

घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन

शाळेबद्दल एक ठोस निर्णय सरकारने दिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

नागपुरात शिवसेनेचा भाजपला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश