मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशोक चव्हाण यांनी औकातीत राहावं असा दम चंद्रकांत पाटील यांनी दिला. त्याला आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे, हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे, असा टोला अशोक चव्हाणांनी यावेळी लगावला.
प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जयंत पाटील हे शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही- अजित पवार
कोरोना विरूद्धच्या लढाईत भारत अजून हरलेला नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
धनंजय मुंडेेंसोबतच्या नात्यासंबंधीचा उलगडा पुस्तकातून करणार; करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत
“भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”