आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल 3 दिवसांपूर्वी जाहीर झाले. यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारत शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव केला. यानंतर शिंदे समर्थकांनी पक्ष कार्यालयावर दगडफेक केली. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांची भेट घेतली. व विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
हे ही वाचा : “संजय राऊतांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्याला राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची हजेरी”
‘सरकार पडेल असे म्हटल्यावर कोणाच्या पोटात दुखायची गरज नाही. मी म्हणत राहणार आणि तसे म्हणण्याचे मला स्वातंत्र्य आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राजकारणात कोणी कोणावर अवलंबून नसते. जेंव्हा गणित जमत नाहीत, तेव्हा माणसे बाहेर पडतात., असं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. सरकार पडण्याची वेळ काय आहे हे मला माहीत नाही. राज्य सरकार योग्य वेळ आल्यावर निश्चित पडेल, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…
महाविकास आघाडीतील आणखी 4 नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार- किरीट सोमय्या
संधी मिळताच राज्यातील जनता आघाडी सरकारला फेकून देईल- चंद्रकांत पाटील