सोलापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना, ‘मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मंत्र्यांच्या थोबाडीत लावली तरी कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे विधान केले होते. त्याला माजी वनमंत्री संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांतदादा पाटील हे जेष्ठ नेते आहेत. राजकारणाची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची, कशी भाषा बोलायची हे सर्वांनी बघितलं पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात कोसळणार, चार महिन्यात पडणार, वर्षभरात पडणार, हे दावे करणे आता बंद झाले आहे. त्यामुळे आता काही तरी वेगळं बोलावं म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशाप्रकारची विधाने केली जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अगदी कोरोनाकाळातही दखलपात्र काम सरकारने केले आहे आणि हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे आज सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार- नाना पटोले
साताऱ्यात राष्ट्रवादीचा भाजपला मोठा दणका; असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; संजय राठोड यांनी केला खुलासा
ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्या- चंद्रशेखर बावनकुळे