मुंबई : जनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली आहे, असं ट्वीट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचेच कर्जमाफ करु असे सांगितलं. मात्र, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा शब्द पाळला नाही. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
जनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मा. @CMOMaharashtra यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचेच कर्जमाफ करु असे सांगितलं. मात्र, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा शब्द पाळला नाही.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 21, 2019
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतची मोठी घोषणा केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत मत व्यक्त केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा
-निलेश राणे यांनी केली संजय राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट
-गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला- राज ठाकरे