औरंगाबाद: राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. यानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवं, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार- राम कदम
“इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर त्यांचाच डाव उलटला”