चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडलाय, त्यामुळे…; संजय राऊतांचा टोला

0
143

मुंबई : टूलकिट तसंच राहुल गांधींकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी हा आरोप केला. दरम्यान देशात अगदी उद्या निवडणूक झाली, तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपला 400 काय अगदी 500 जागाही मिळू शकतात, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, एवढंच काय ते जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकतात. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन वाढणार?, आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणं हेच मोदी सरकारचे धोरण- राहुल गांधी

भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; टूलकिटवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार

आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here