आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ज्यांनी आमच्या जीवावर 18 खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. यावरून आता शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : “अभिनेत्री कंगणा रणाैत पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी”
चंद्रकांत पाटलांच्या नैराश्यापोटी वल्गना सुरु आहेत. आपण सेनेचं बोट धरुन मोठे झालात विसरु नका, असा इशारा शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही. तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलुन वेगवेगळ्या वल्गणा करतायेत, असा पलटवार शंभूराज देसाई यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
मी पंतप्रधानांसारखा नापास नाही, माझं मार्कशीट पाहू शकता; काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला
शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये ठिणगी; प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे शिवसेनेवर गंभीर आरोप
अबब! 20 वर्षांची तरुणी पडली 77वर्षीय आजोबांच्या प्रेमात; खोटं बोलून करणार होती लग्न, पण…