Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही- हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही- हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असं हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.

दरम्यान, भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप परवानगी कशी देईल?  दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे., असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

‘हे’ सरकार शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे शत्रू आहे; प्रियांका गांधीची मोदी सरकारवर टीका

कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे

अजिंक्य रहाणे-शिखर धवनची शानदार अर्धशतके; दिल्लीची बेंगलोरवर 6 विकेट्सनी मात