मुंबई : दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. या सगळ्या घडामोडींनंतर चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना राज्यात मोठा भाऊ आणि देशात लहान भाऊ, तर भाजपा देशात मोठा भाऊ आणि महाराष्ट्रात छोटा भाऊ असं युतीचं समीकरण होतं.
दरम्यान, शिवसेनेकडून यावर काही भूमिका मांडली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“…तर मी देवेंद्र फडणवीस यांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारेन”
ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार
“माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष उभारला आहे; पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे”
“वारिस पठाण यांचं वक्तव्य मुस्लिम समाजालाही मान्य नाही”