हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील

0
247

सोलापूर : महाआघाडीच सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

शरद पवार पावसात भिजले, ईडीची त्यांना भीती दाखवली. त्यामुळे काही झाले असे नाही, तर आपण एकोप्याने वागलो नाही. त्यामुळे 50 जागा गेल्या 12 कोटींचे सरकार गेलं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारस्थापन करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 20 जागांची आवश्यकता आहे. 50 जागा अशा आहे जिथे मत विभाजन झालं आहे. अहमदपूरमध्ये सिटिंग आमदार पडला. कारण बंडखोर उमेदवाराने 25 हजार मतं घेतली, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काळजी करु नका, कारण हे सगळे किती दिवस एकत्र थांबणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. हा पण जेवढे दिवस थांबतील तेवढे दिवस वाट लावतील, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

-माझी लढाई शरद पवारांसोबत होती- पंकजा मुंडे

-खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा बालहट्ट; संसदेतील सर्व नेत्यांशी घडवून आणली भेट

-बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठीकाणी उभा राहणार स्मारक

-माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here